एकात्मिक बाल विकास सेवा योजना

जिल्हयात एकूण १५ बाल विकास प्रकल्प कार्यरत आहेत. या प्रकल्पात २६३८ अंगणवाडी केंद्गे, मिनी अंगणवाडी केंद्गाचे माध्यमातुन अंगणवाडी केंद्गातील लाभार्थींना खालीलप्रमाणे लाभ उपलब्ध करून देण्यात येते.
 
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे उदिष्टे खालील प्रमाणे आहे.
 
1)     ० ते ६ वर्ष वयोगटातील मुलांना पोषण व आहार विषयक दर्जा सुधारणे
2)     मुलांना मानसीक, शारिरीक, सामाजिक विकासाचा योग्य पाया घालणे.
3)     बालमृत्यु व कुपोषण कमी करणे.
4)     मुलांच्या सार्वत्रिक विकासाचा कार्यक्रम अधिक कार्यक्षम बनविण्यासाठी विविध विभागाशी धोरण अमंलबजावणी बाबत समन्वय साधने.
बालकांच्या आरोग्य विषयक शिक्षणाव्दारे क्षमता वाढविणे.
 
लाभार्थीना पुरविण्यात येणा-या सेवा
 
पुरक पोषण आहार -
           अंगणवाडी केंद्गात येणारी ६ महिने ६ वर्षाची सर्व बालके, स्तनदा माता व गरोदर स्त्रियांना अतिरिक्त आहार, प्रति लाभार्थी प्रति दिन रू.३.९२ प्रमाणे बचतगटांचे माध्यमातून यामध्ये शासनाने ठरवुन दिलेल्या पाक कृती प्रमाणे देण्यात येते.
 
आरोग्य तपासणी -
              अंगणवाडी केंद्गातील लाभार्थीची आरोग्य तपासणी प्राथमिक स्वास्थ केंद्गातील भेषज अधिकारी यांचे माध्यमातून ३ महिण्यातुन एकदा करण्यात येते. प्रत्येक महिण्यांत प्रकल्प स्तरावर व जिल्हास्तरावर सभा घेंवुन आढावा घेण्यांत येते व नियोजन करण्यांत येते. मध्यम कूपोषीत (मॅम) व तिव्र कूपोषीत (सॅम) च्या मुलांची आरोग्य तपासणी करून त्यांना संदर्भ सेवा देण्यात येते.
 
लसीकरण -
        अंगणवाडीतील सर्व मुलांच्या शरीरामध्ये प्रतिकार क्षमता वाढावी व रोग होवु नये म्हणुन वेळेचे पुर्वीच लहान असतांना लसीकरण करण्यात येते.
 
 
 
पोषण व आरोग्य शिक्षण -
 १८ ते ४५ वर्ष वयोगटातील मातांकरिता पोषण व आरोग्य शिक्षण अंगणवाडी क्षेत्रातील १८ वर्ष वयोगटातील युवा भावी माता आहेत. त्यांना आरोग्य पोषण आहार, स्वच्छतेबाबत दर महिण्यांत प्रशिक्षण देवुन मार्गदर्शन करण्यांत येते.
 
५. अनौपचारीक शिक्षण -
 
अंगणवाडीतील ३ वर्ष ते ६ वर्ष वयोगटातील लाभार्थींना अनौपचारीका शिक्षण देण्यांत येते. मुलांच्या मानसिक शारिरीक दर्जा सुधारावा याकरिता त्यांना अनौपचारीक शिक्षण देण्यात येते.

No comments:

Post a Comment