संपूर्ण स्वच्छता अभियान

संपूर्ण स्वच्छता अभियान
संपूर्ण स्वच्छता अभियान , जि.प. चंद्गपूर
             संपूर्ण स्वच्छता अभियान लोकाभिमुख आणि लोकसहभागावार आधारीत करणे, तसेच मागणीवर आधारीत अंमलबजावणी हा दृष्टिकोन स्विकारणे, संपूर्ण स्वच्छता अभियानाचे प्रमुख उद्दीष्ट ग्रामीण भागातील जीवनमानाची गुणवत्ता उंचावणे, ग्रामीण भागात स्वच्छता कार्यक्रमाची व्यापकता वाढविणे, जाणीव जागृती व आरोग्य विषयक शिक्षण यातून स्वच्छतेच्या सुविधांची मागणी निर्माण करणे, ग्रामीण भागातील शाळा, अंगणवाड्यातून स्वच्छतेच्या सुविधा निर्माण करणे आणि विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक शिक्षण देणे व स्वच्छतेच्या सवयी लावणे, स्वच्छतेचे कमी खर्चाच्या आणि योग्य तंत्रांना प्रोत्साहन देणे, पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे व अन्नपदार्थांचे प्रदुषण कमी करण्यासाठी उघड्यावर मलमुत्र विसर्जन करण्याच्या पध्दतीचे निर्मूलन करणे.
 
            या अभियाना अंतर्गत दारिद्ग्य रेषेखालील कुटुंबांनी स्वतःचे स्वतःच कमी खर्चाचे शाक्चालय स्वतःच करायचे असून बांधकाम पूर्ण झाल्यानंतर, त्याचा योग्य तो वापर त्या कुटुंबांनी केल्या नंतर त्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन निधी रु.२२००/- देता येतात.
 
            सामुदायिक शौचालय संकुलासाठी जास्तीत जास्त रू. २,००,०००/- एवढी रक्कम मान्य केलेली असून २० टक्के लोकवर्गणीची रक्कम रू. ४०,०००/- गावकर्‍यांना भरणे अपेक्षीत आहे.
 
            शालेय स्वच्छता व आरोग्य शिक्षण कार्यक्रमा अंतर्गत् उघड्यावर शौचास बसू नये यासाठी लहान मुलांची मानसिकता बदलण्यासाठी लागणारे प्रोत्साहन व त्या विषयीचे शिक्षण देण्यास शाळा व अंगणवाडी ही योग्य माध्यमे आहेत. शाळेत शिक्षकांकडून मिळालेले स्वच्छतेचे धडे मुले अंगीकारतील आणि ते सहजच पालकांपर्यंत जाऊन पोहचतील. त्यामूळे पालकांच्या मानसिकतेतही बदल होऊन ते देखील स्वच्छतेच्या चांगल्या सवयी स्विकारतील. शाळांमध्ये मुले-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह बांधण्यासाठी रू. २०,०००/- किंमतीमध्ये यांचे कडून १० टक्के लोकवाटा अपेक्षीत आहे. अंगणवाडीमध्ये स्वच्छतागृहासाठी रू. ५,०००/- देता येतात.
 
            स्वच्छतेच्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि पर्यावरणीय सुविधा निर्माण करण्यासाठी लागणार्‍या सामुग्रीची विक्री ग्रामीण स्वच्छता साधन सामुग्री दुकाने आणि निर्माण केंद्ग करिता स्वयंसहाय्यता बचत गटा आणि ग्राम पंचायत केंद्ग चालवू शकतात.
 
            पंचायत राज संस्थेच्या भूमिकेनुसार घटनेच्या ७३ व्या दुरूस्तीप्रमाणे स्वच्छता हा विषय ११ व्या कलमा मध्ये येतो. त्यानुसार संपूर्ण स्वच्छता अभियानामध्ये ग्राम पंचायतीची भूमिका महत्वाची आहे.
 
 
 
 
निर्मल ग्राम पुरस्कार योजना
 
            संपूर्ण स्वच्छता अभियानाची अंमलबजावणी अधिक कार्यक्षमपणे होण्यासाठी केंद्ग सरकारने निर्मल ग्राम पुरस्कार ही योजना केली आहे. संपूर्ण पणे स्वच्छ झालेल्या आणि उघड्यावरील संडासापासून मुक्त झालेल्या ग्राम पंचायती करिता, तालुक्याकरिता आणि जिल्ह्याकरिता हा पुरस्कार आहे. निर्मल ग्राम पुरस्कारात पुढील बाबींचा अंतर्भाव आहे.
 
1.                  अ) पात्रता
¨      ग्राम पंचायत, तालुका, जिल्हा याद्वारे १०० टक्के स्वच्छता अभियानाची यशस्विता.
¨      १०० टक्के घरांसाठी शौचालय सुविधा
¨      १०० टक्के शाळांमध्ये / अंगणवाडी सवच्छतागृह
¨      उघड्यावरील संडास, पाणी न लागणारी स्वच्छता गृहे आणि डोक्यावरून मैला वाून नेणे इ. पध्दतीचं निर्मूलन.
¨      पयावरणातील स्वच्छतेची देखभाल.
सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन.
 
विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात वरील प्रकारच्या स्वच्छतेचे यशस्विरित्या पालन होण्यासाठी प्रेरणादायी ठरलेल्या व्यक्ती आणि संस्था.
ब)        प्रोत्साहनपर निधी.
            प्रोत्साहनपर निधीची रक्कम लोकसंख्येवर आधारीत आहे. आणि त्याचे निकष पुढील प्रमाणे आहेत.
अ. क्र.
तपशिल
ग्राम पंचायत
तालुका
जिल्हा
लोकसंख्या निकष
१००० पर्यंत
१००१-२००० आणि जास्त
 
५०००० पर्यंत
५०००१ आणि जास्त
१० लाख पर्यंत
१० लाख पेक्षा जास्त
रोख प्रोत्साहन निधी
२ लाख
 
४ लाख
१० लाख
२० लाख
३० लाख
५० लाख
व्यक्तींसाठी प्रोत्साहन निधी
१० हजार
 
२० हजार
३० हजार
पंचायत राज संस्थे व्यतिरिक्त इतर संस्थांसाठी प्रोत्साहनपर निधी
२० हजार
 
३५ हजार
५० हजार
 
निर्मल ग्राम पुरस्कार योजना
 
            संपूर्ण स्वच्छता अभियानाची अंमलबजावणी अधिक कार्यक्षमपणे होण्यासाठी केंद्ग सरकारने निर्मल ग्राम पुरस्कार ही योजना केली आहे. संपूर्ण पणे स्वच्छ झालेल्या आणि उघड्यावरील संडासापासून मुक्त       झालेल्या ग्राम पंचायती करिता, तालुक्याकरिता आणि जिल्ह्याकरिता हा पुरस्कार आहे. निर्मल ग्राम पुरस्कारात पुढील बाबींचा अंतर्भाव आहे. आता पर्यंत जिल्हयात एकूण ८२ ग्रा.पं. निर्मल ग्राम पुरस्कारासाठी पात्र ठरल्या आहेत.
 
           
2.                  पात्रता
¨      ग्राम पंचायत, तालुका, जिल्हा याद्वारे १०० टक्के स्वच्छता अभियानाची यशस्विता.
¨      १०० टक्के घरांसाठी शौचालय सुविधा
¨      १०० टक्के शाळां अंगणवाडयांमध्ये स्वच्छतागृह
¨      उघड्यावरील संडास, पाणी न लागणारी स्वच्छता गृहे आणि डोक्यावरून मैला वाून नेणे इ. पध्दतीचं निर्मूलन.
पयावरणातील स्वच्छतेची देखभाल. सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन.
 
           चंद्गपूर जिल्हायास संपूर्ण स्वच्छता अभियानाअंतर्गत ११०७४३ वैयक्तिक शौचालयाचे, २०२२ शालेय शौचालयाचे, ६६ सामुहीक शौचालयाचे, २००७ अंगणवाडी शौचालयाचे, १२ साहीत्य विक्री केंद्गाचे उदिष्ठ शासनाकडून मंजूर असून माहे एप्रील २०१० पर्यत बी.पी.एल. लाभाथ्याच ८२९०३ वैयक्तिक शौचालय व ए.पी.एल. लाभार्थ्याचे ६९८४० वैयक्तिक शौचालय असे एकूण १५२७४३ वैयक्तिक शौचालयाचे, २०२२ शालेय शौचालयाचे, १८३३ अंगणवाडी शौचालयाचे, ४४महिला शौचालयाचे, बांधकाम पूर्ण झालेले आहे. तसेच ग्रामपंचायत स्तरावर साहीत्य विक्री केद्गाची स्थापना करण्यांत आलेली आहे.
              माहे नोव्हेंबर २०१० अखेर जिल्हयांत ८२ ग्रामपंचायतीना निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त झालेला आहेᅠ. सन २००९-१० मध्ये एकूण ७२ ग्रामपंचायतीचे निर्मल ग्राम पुरस्काराचे प्रस्ताव राज्य शासनाकडून केंद्ग शासनाकडे मंजूरीकरीता सादर केलेले आहे. त्याबाबतची फेरतपासणी नुकतीच झालेली आहे.
            प्रकल्पाच्या सुरवातीपासून ते माहे नोव्हेंबर २०१० पर्यत चंद्गपूर जिल्हयांस केंद्ग व राज्य शासनाकडून एकूण २४१९.८५ लक्ष तरतूद प्राप्त झालेली असून माहे नोव्हेंबर २०१० पर्यत खालीलप्रमाणे बाब निहाय खर्च
झालेला आहे.
  
अ.क्रं
बाब
केंद्ग
राज्य
लाभार्थी
एकूण
१.
वैयक्तिक शौचालय
७६०.४३
३४२.६८
२३२.८९
१३३६.००
२.
शालेय शौचालय
२६७.४५
१०७.३१
२१.१०
३९५.८६
३.
सामुहीक शौचालय
६४.१३
२०.३१
१४.९४
९९.३८
४.
साहीत्य विक्री केंद्ग
 १९.१०
४.२०
२३.३०
५.
अगणवाडी शौचाालय
 ५२.६४
३०.०३
६.२९
८८.९६
६.
सुरुवातीचे कामे
०.५०
०.५०
७.
माहिती शिक्षण व संवाद
१२४.३५४१
३७.२६
१६१.६२
८.
प्रशासकीय खर्च
५३.१७
१३.२६३६
६६.४४
 
एकूण
१३४१.७७८
५५५.०६
२७५.२२
२१७२.०६
  
        उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं.)
                                                                                                        जिल्हा परिषद, चंद्गपूर

No comments:

Post a Comment